आज आटपाडीत निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर यांचे कीर्तन

गुरुवार दि.13 जुलै 2023 ( महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – वैभव माळी – आटपाडी) संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी सोहळा समिती, आटपाडी यांच्या वतीने सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात आज गुरुवार दि.13 जुलै 2023 रोजी रात्री 9 वाजता येथील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मठ आटपाडी येथे प्रसिद्ध सामाजिक प्रबोधनकर ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. अशी माहिती उत्सव समिती च्या वतीने देण्यात आली आहे. सप्ताह ची सुरुवात रविवार दि.9 जुलै 2023 रोजी झाली असून सांगता रविवार दि.16 जुलै 2023 रोजी होणार आहे. या सप्ताहात दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रमात काकड आरती, ग्रंथवाचन, पूजा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, प्रार्थना, हरजागर आदीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ह. भ. प. महाराज यांची कीर्तन आणि प्रवचन सेवा झाली त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सर्वांचे आकर्षण असलेल्या इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन होणार आहे. यासाठी समितीच्या वतीने भाविकासाठी खास बैठक व्यवस्था केली आहे. तरी पंचक्रोशी तील लोकांनी या कीर्तनचा लाभ घ्यावा असे उत्सव समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.