गुरुवार दि.13 जुलै 2023 (वैभव माळी, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – आटपाडी) श्री क्षेत्र अरण जि. सोलापूर येथील श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आटपाडी जि. सांगली येथील संत सावता माळी मठ येथे रविवार दि.9 जुलै 2023 रोजी ते रविवार दि.16 जुलै 2023 रोजी या कालावधीत पुण्यतिथी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सप्ताहात दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रमात काकड आरती, ग्रंथवाचन, पूजा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, प्रार्थना, हरजागर आदीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ह.भ.प. महाराज यांची कीर्तन आणि प्रवचन सेवा झाली त्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सोहळा समितीच्या वतीने सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात आता पर्यंत ह.भ.प. जनार्धन महाराज बाड – विठ्ठलापूर, ह.भ.प. किसान महाराज अर्जुन – आंबेवाडी, ह.भ.प. नंदकुमार महाराज थोरात – हिवतड यांचे प्रवचन झाले तर ह.भ.प. बाळासाहेब महाराज पिसे – करगणी, ह.भ.प. यशोदा हेटकळे -महूद, ह.भ.प.प्रा.गणेश माने – दिघंची यांचे प्रवचन होणार आहेत. तसेच ह.भ.प. राहुल महाराज फडतरे – दिघंची, ह.भ.प. कृष्णा महाराज डव्हळे – देवाची आळंदी, प्रवीण महाराज शेलार – आंबेघर यांचे कीर्तन झाले आहे. तर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर, ह.भ.प. सुप्रियाताई साठे-ठाकूर पिंपरी पुणे, ह.भ.प.प्रा.सागर महाराज बोराटे – नातेपुते, ह.भ.प. मोहन काका पाटील – घोटी खुर्द यांचे कीर्तन होणार आहेत. तसेच हरजगार साठी दत्त सांप्रदाय महिला भजनी मंडळ – फुलेनगर, विठ्ठलनाथ भजनी मंडळ – आटपाडी, विठ्ठल भजनी मंडळ विठ्ठलापूर, अगस्ती भजनी मंडळ – अगस्तीनगर यांनी भजनी सेवा सादर केली तर लेंगरेवाडी भजनी मंडळ – लेंगरेवाडी, जय हनुमान भजनी मंडळ – जरंडी, हनुमान भजनी मंडळ – देशमुखवाडी, संत सावता माळी भजनी मंडळ – आटपाडी यांची भजनी सेवा सादर होणार आहे. सप्ताहात दैनंदिन काकड आरती, पूजा तसेच ग्रंथवाचानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साप्ताहाची सांगता रविवार दि.16 जुलै 2023 रोजी पुष्पवृष्टी, पालखी आणि महाप्रसादाने होणार आहे. या उत्साहासाठी समस्त माळी समाजातील लोकांनी सहकार्य केले आहे. तरी भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असे सोहळा समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

