आटपाडी दि .11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राष्ट्रवादीतील सर्वांच्या साथीने महाविकास आघाडीतील पक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवेल अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खानापूर – आटपाडी मतदार संघाचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केल्या. राजारामबापू हायस्कुल येथे आज संपन्न झालेल्या राष्ट्रवादी च्या मार्केट कमिटीचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांच्या व्यापक बैठकीत वैभवदादा पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील हे होते. उमेदवार, कार्यकर्ते, नेत्यांनी येत्या काही दिवसात मतदारांच्या भेटी गाठी घेत त्यांच्याशी संपर्क वाढवावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंतराव पाटील यांना मानतो म्हणणाऱ्यांनी आजच्या बैठकीस यायला हवे होते. राहीलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत रावसाहेबकाका पाटील, विष्णूपंत पाटील यांनी संपर्क करून एक बैठक घडवावी. त्यांच्याशी समर्पक चर्चेतून पक्षीय एकसंघता आणू, समविचारी पक्षाची मंडळीही आपल्या बरोबर येतात का ते पाहू. जयंतराव पाटील साहेबांशी अंतिम चर्चेनंतर मोठ्या ताकदीने तुम्हां सर्वांच्या पाठीशी उभा राहीनच तथापी प्रत्येक गावात प्रत्येक मतदारांपर्यत येण्याची माझी ही तयारी असेल. आम्ही कोठेच आमचा अजेंडा राबवत नाही. उद्याच्या विधानसभेला आमच्या पेक्षाही सक्षम नेतृत्व पुढे आल्यास त्यांच्या साठी दोन पावले मागे सरण्याची ही आमची तयारी असेल. असे ही वैभवदादा पाटील यांनी स्पष्ट केले. जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा करूनच जेष्ठत्वाच्या नात्याने तालुक्यात पक्षीय बांधणी, एकजुट सुरु केली आहे. मला कोणतीही सत्तास्थाने मिळवायची नसल्याने सर्वांना एकत्रित आणण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आज न आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वैभवदादा पाटील यांच्या समवेतच्या बैठकीसाठी एक दोन दिवसात बोलावू, त्यांची नाराजी दुर करू. आणि या वास्तवतेचा सर्व अहवाल जयंतराव पाटील यांच्यापर्यत पोहचवून योग्य निर्णय त्यांच्याकडून व्हावा यासाठी आग्रही राहू असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केले. आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकां मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ दावेदार म्हणून पुढे यावी, पक्षाचा जागर सर्वत्र व्हावा. या भावनेतूनच सुरज पाटील व आम्ही सर्वांनी मार्केट कमिटीची निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. वैभवदादा पाटील यांनी आमच्या प्रयत्नांना मोठी साथ द्यावी. काही जागांच्या बदल्यात विरोधक असलेल्या कोणाच्याही दावणीला राष्ट्रवादीला बांधू नये. पक्षीय विरोधकांशी कोणत्याही स्थितीत युती न करू नये. असे मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी आठ – दहा वर्षा पासून पक्षाचे नेतृत्व करणारांनी मतभेदाला तिलांजली देत आता सक्षमपणे पुढे आले पाहीजे. असे स्पष्ट केले .प्रारंभी युवक राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांनी या निवडणूकीतल्या पॅनेल ची रचना व भूमिका विषद केली. ज्येष्ट नेते विष्णूपंत चव्हाण – पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर नांगरे – पाटील, महिला राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिताताई पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रा.एन.पी.खरजे, खरसुंडीचे नेते विजयराव पुजारी, हिवतडचे ज्येष्ट नेते रंगराव कदम, निंबवडेचे गणेश कबीर सर, इत्यादी अनेकांची मार्केट कमिटी निवडणुक लढवावी असा सुर व्यक्त करणारी भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजीराव पाटील, विभूतवाडीचे हिंदूराव शेठ थोरात, घरनिकीचे ग्रा. पं . विकी बेरगळ, बोंबेवाडीचे दिनकर करांडे, महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौ अश्विनीताई अष्टेकर – कासार, महिला नेत्या सौ . आशाताई देशमुख, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, शेटफळेचे नेते राजाभाऊ गायकवाड, माजी सरपंच संभाजीआबा गायकवाड, कामथचे माजी सरपंच परशुराम सरक, गोमेवाडीचे संपतराव पाटील, दिघंचीचे मनोज भोसले, अरुण टिंगरे, उत्तम ढोले, लिंगीवरेचे नितीन पुंढ, निंबवडचे ज्ञानेश्वर होळे, आटपाडीचे आबासाहेब नांगरे – पाटील, तुषार पवार, तानाजीराव पाटील, खलील मुलाणी, जालींदर खंडागळे, सोमनाथ गवळी, करगणीचे माजी उपसरपंच किसन काळे, खरसुंडीचे दस्तगीर संदे, बनपुरीचे सर्जेराव घुटुगडे, उंबरगाव ग्रा.पं. सदस्य रमेश सावंत, हितडवळेचे प्रशांत मोटे, मासाळवाडीचे नितीन डांगे, माजी उपसरपंच श्रीमंत पुजारी, संजय पुजारी, लेंगरेवाडीचे सुनिल लेंगरे, वलवणचे विशाल जाधव, पिंपरी खुर्दचे माजी उपसरपंच आशीश जाधव, उंबरगावचे प्रशांत गाढवे, इत्यादी अनेक जण उपस्थित होते . प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांनी अभिवादन केले. स्वागत – प्रास्तावीक प्रभाकर नांगरे – पाटील यांनी केले सुत्रसंचालन गणेश ऐवळे यांनी केले तर आभार किशोर गायकवाड यांनी मानले.
