आट्टा चक्कीमुळे “दगडाचं जातं” होतय हद्दपार…!

शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) अलीकडच्या धावपळीच्या व अत्याधुनीक युगात माणसांचा अधुनिकतेकडे वाढता कल आहे त्यामुळे मोठ मोठ्या शहरांमधील बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव हळुहळु ग्रामीण भागाकडेही पडल्याचे दिसुन येते त्याचं कारणही अगदी तसचं आहे पाच दहावर्षापुर्वी शहरांपुरती अथवा धनदांडग्यांच्या कुटुंबीयांच्या घरांपुरती मर्यादीत असणारी आट्टाचक्की आता हळुहळु घरोघरी पोहचु लागल्याने आट्टा चक्कीच्या जमान्यात परंपरागत ओवींची परंपरा जोपासणारे “दगडाचे जाते”मात्र घरातुन हद्दपार होवु लागले आहे. पूर्वी डोंगर कपार्‍यांमध्ये वसलेल्या ग्रामीण भागातील खेडोपाड्यात प्रत्येक घरामधील एखाद्या कोपर्‍यात भिंतीलगत जातं रोवलेलं असायचं घरातील महीला पहाटे लवकर उठुन जात्यावरती दळण दळायच्या तसेच सणासुदीच्या दिवसी अनेक घरातील महीला एकत्र येवुन जात्यावरतीरती दळण दळत असत त्यावेळी दळताना शारीरीक श्रम होत असल्याने महीलाही अगदी वयस्कर असल्या तरी ठणठणीत असायच्या. जात्यावरती परंपरागत ओव्या गायल्या जायच्या त्यातुन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हायचे मात्र कालानुरुप सर्वत्र बदल घडु लागला मातीच्या घरांएवजी सिंमेटचे बंगले गावागावात आपले जाळे पसरु लागले आणि चकाचक फरशीने घरे उजाळु लागली त्यामुळे सिमेंटच्या घरांमधुन जाते जवळजवळ हद्दपारच झाले आहे जात्याचा घरघरणारा आवजही लुप्त झाला आहे. सध्या सर्वत्र विद्युत लाईट पोहचल्याने आटा चक्की घरोघरी पोहचु लागली आहे त्यामुळे महीलांवर्गाचे शारीरीक श्रम ही कमी झाले आहे मात्र हा बदल चांगला असला तरीही महीलांमध्ये अनेक अजारांना बळी पडावे लागत असल्याचे दिसुन येते त्यामुळे जात्याचे केवळ दळणासाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही फायदा होत असे.अधुनीक बदलामुळे पुर्वीपारपासुन घरात असणारे जाते हद्दपार झालेच तर येणार्‍या पिढीला केवळ ते चित्रातच दाखवावे लागेल हे मात्र नक्की..!