आम्ही कवठेएकंद कर फलकाचे अनावरण

तासगाव, दि.29 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेएकंद ता. तासगाव येथील श्री सिद्धराज देवालय चौकात ” आम्ही कवठे एकंदकर “अशा नाम फलकाच्या अनावरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात  करण्यात आले.गावच्या सौंदर्याच्या दृष्टीने सिद्धराज देवालयाच्या कमानी जवळ  सुशोभीकरण करून  “आम्ही कवठे एकंदकर ” असा सेल्फी पॉईंट  साकार करण्यात आला आहे.

बिराडसिद्ध देवालय ट्रस्ट यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बनवण्यात आलेल्या नाम फलकाचे अनावरण नुकतेच मोठ्या जल्लोषी वातावरणात करण्यात आले. गावचा दसरा उत्सव  हा सर्व जाती-धर्माच्या   ऐक्याचे प्रतीक आहे. गावची एकात्मता  दर्शवण्याच्या दृष्टीने “आम्ही कवठे एकंदकर” असा शब्द उल्लेख करण्यात आला आहे. लेसर शो, गाण्यांचा निनाद, आणि आतषबाजीच्या जल्लोषात अनावरण  सोहळा पार पडला.त्यावेळी  मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

त्याप्रसंगी सरपंच राजेंद्र शिरोटे,  उपसरपंच जयश्री पाटील, प्रा.बाबुराव लगारे, अशोक घाईल,दीपक घोरपडे, डॉ. विवेक गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र शिरोटे यांनी, तर आभार अनिल देशमाने यांनी मानले.