आयुष्मान भव योजना लोक कल्याणकारी – तहसीलदार रविंद्र रांजणे

गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव) केंद्र व राज्य शासना कडून सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी रबविण्यात येणारी महत्वकांशी योजना ‘आयुष्मान भव’ ही लोक कल्याणकारी योजना असल्याचे प्रतिपादन तासगावचे तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार रांजणे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आयुष्मान भव हा उपक्रम दि.१३ सप्टेंबर २३ ते ३१ डिसेंबर 2 या कालावधीत राबविण्यात येत असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयवदान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी हे उपक्रम आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहेत. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वैजय वाळके, डॉ.लवटे, डॉ.साहिल जमदाडे इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचारी व उपस्थित रुग्ण यांनी अवयवदान जनजागृतीची शपथ घेतली.