उमेद व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने आयोजन
नथुराम कुंभार (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
शिराळा दि.8 फेब्रुवारी 2023
आरळा ता.शिराळा येथे उमेद ग्रामसंघ व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी महाजन गॕस एजंन्सीच्या – सुखदा महाजन होत्या यावेळी साधना पाटील,आरळा गावच्या लोकनियुक्त सरपंच बाळाबाई धामणकर, सोनवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली नाईक, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,सुधिर बंडगर,संदीप चव्हाण,बाबासो बेरडे,शामराव निर्मळ आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन व प्रतीमा पुजन करण्यात आले
प्रारंभी मान्यवरांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संदीप चव्हाण, साधना पाटील, सुखदा महाजन, सुधिर बडगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान यावेळी झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली तसेच या
कार्यक्रमासाठी समाजसेवक शंकरदादा मोहीते यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे संयोजन माजी सरपंच निलोफर डांगे,विश्वासच्या संचालिका अनिता चौगुले, मनिषा कुंभार,सरिता पाटील,सविता भाष्टे,अर्चना कांदेकर,सुनंदा कुंभार यांनी केले होते.
यावेळी प्रकाश धामणकर, कोंडीबा चौगुले,रेश्मा देशपांडे,ज्योती आमले,सोनाली शिरंबेकर,अनिता कांबळे,संगीता पाटील,अश्वीनी कुंभार,हिना डांगे,हसीना मुल्ला,लक्ष्मी पावसकर यांचेसह आरळा गावासह परीसरातील वाडी वस्तीवरील महीला मोठया संख्येने उपस्थीत होत्या.कार्यक्रमाचे सुञसंचालन माधुरी कुंभार यांनी केले तर आभार निलोफर डांगे यांनी मानले.
