आरळ्यात बैलगाडा शर्यती उत्साहात संपन्न

स्व.शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजन

शिराळा, दि.7 एप्रिल 2023 (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)आरळा (ता.शिराळा) येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. शर्यतीमध्ये प्रथम सञात आरळा गावातील बैलगाडा शर्यती पार पडल्या. या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक नथुराम घोडवील, द्वितीय क्रमांक अजय भाष्टे तर तृतीय क्रमांक शामराव नांगरे यांनी पटकावला. दुसऱ्या सत्रात परगावाहून आलेल्या बैलगाडींच्या शर्यती झाल्या.यामध्ये प्रथम क्रमांक अंकुश नांगरे (शित्तुर वारुण), द्वितीय क्रमांक बाळकु इंदुलकर (खेडे कोतोली), तृतीय क्रमांक रेणुका प्रसन्न (औंढी), चौथा क्रमांक सांबवेकर (भटवाडी), पाचवा क्रमांक भैरोबा प्रसन्न (कोपर्डे) तर सहावा क्रमांक सुरेश नांगरे यांच्या बैलगाडीने पटकावला.विजयी बैलगाड्यांचा कमेटीने रोख रक्कम व ढाल देऊन गौरव केला. या शर्यतींचे उदघाटन माजी सरपंच हिंदुराव नांगरे, उपसरपंच राजु सुर्यवंशी, सदस्य विजय भाडुगळे, ग्रामविकास अधिकारी एम.एन.पाटील, आनंदा घोडवील, विश्वनाथ देशपांडे, एम.एन.आवळे, अशोक बेरडे, तानाजी भाष्टे, महादेव गुरव, शामराव नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय नांगरे, वसंत भाष्टे, विजय भाष्टे, संजय पाटील, बाळु घोडविल, चंद्रकांत बेलवणकर, दगडू पाटील, बबन पाटील, युनुस मुजावर, शेखर शिरंबेकर, रघुनाथ गायकवाड आदि मान्यवरांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.