तासगाव शहर राष्ट्रवादी चा उपक्रम
तासगाव, दि. 16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त तासगाव शहर राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या वतीने तासगाव शहर स्वच्छता अभियान राबाविण्यात आले.
अभियानाची सुरवात जिजाऊ चौक, क्रांती चौक, वरचे गल्ली येथून झाली. स्टेशन रोडची स्वच्छता करत लोकनेते डी.एम. बापू पाटील क्रीडागणांची स्वच्छता केली तसेच भिलवडी नाका परिसर, क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानाची स्वच्छता केली. त्याचबरोबर स्व. आर आर आबा यांच्या स्मारकच्या भोवतीचा परिसर स्वच्छ केला. क्रांती स्तंभ, तलाठी कार्यालय परिसर स्वच्छ केला या उपक्रमास युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी उपस्थित राहून स्वच्छता केली. या अभियानात औषध फवारणी चे 10 ट्रॅक्टर, स्वच्छता दूत, आर आर आबा प्रेमी, केसरी प्रतिष्ठान, शेकाप व 200 हून अधिक राष्ट्रवादी पार्टीचे युवक महिला कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी युवा नेते अक्षय चव्हाण-धाबुगडे, बांधकाम कामगार सेल तालुका अध्यक्ष शरद रेंदाळकर, अजय काका पाटील, अँड गजानन खुजट, तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, अमोल नाना शिंदे, बाळासाहेब सावंत, निलम पवार, अनिल जाधव संजय पाटील, युवक अध्यक्ष अभिजीत पाटीत, मनोज पाटील, खंडू कदम, स्वप्निल जाधव, विजय अडसूळ, अजय डिसले, अविनाश घोडके, शुभांगी साळुंखे, अमित पवार, शरद शेळके, अर्जुन थोरात, व्ही डी के कंपनी चे मॅनेजर दादासो जाधव, व्यवस्थापक रोहित चव्हाण, सुपरवायझर दीपक भोसले, चालक अविनाश जावळे, विलास जाधव, सुरेश जावळे, संदीप जावळे, दिनकर चव्हाण, मोहन जावळे, अमोल जाधव, सागर जावळे, रमेश देवकुळे, सुनील चव्हाण यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.


