डॉ. वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात प्रा.आर.बी.मानकर यांचा सेवागौरव समारंभ संपन्न
तासगाव, शनिवार दि.29 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) माणसाने किती नम्र असावं त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा.आर.बी.मानकर हे आहेत एक संवेदनशील मनाचा प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे गौरव उदगार विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.आर. आर.कुंभार यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे प्रा.आर.बी.मानकर यांच्या सेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले मानकर सरांचा स्वभाव अजातशत्रू आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागण्यामुळे महाविद्यालयात आणि बाहेर त्यांच्याविषयी आपुलकी आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व सांगली जिल्हा विभागप्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी आर.बी.मानकर यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, प्रा.आर.एस.मोटे, प्रा.पी.व्ही.पाटील, प्रा.एस.डी.पाटील, प्रा.एम.डी.माने, प्रा.जी.के.पाटील, प्रा.के.एम.माने, दिपाली मानकर, श्रद्धा मानकर , शोभा आडूरकर, शांताबाई मानकर यांनी आपल्या मनोगतातून मानकर यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक उपप्राचार्य जे.ए.यादव यांनी केले तर आभार स्टाफ सेक्रेटरी प्रा.ए.आर.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग उपस्थित होते.
