शिराळा, दि. २० मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्षांचं वेगळं महत्त्व आहे. मात्र वाढते शहरीकरण आधुनिकीकरण यामुळे हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने वारणावती ( ता. शिराळा ) येथील पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने सुंदर हस्ताक्षरात फलक लेखन करून हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
