एन एम एम एस परीक्षेत लक्ष विद्यालयाचे यश

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) केंद्रीय शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन एम एम एस) परीक्षेत लक्ष विद्यालय मणेराजुरी ता. तासगाव मधील विद्यार्थ्यानी यश संपादन केले. या परीक्षेत पार्थ कोंदाडे, सार्थक आढळी, सुजल जाधव, समर्थ एडके, संग्राम शिंदे, कार्तिक कोरे, विराज दुशारेकर यांनी घवघवीत यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे अध्यक्ष विशाल माळी, सचिव रुपाली माळी तसेच मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.