करुंगली येथे पशु वंधत्व निवारण शिबीर संपन्न

शिराळा, दि.२७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – नथुराम कुंभार करुंगली ता.शिराळा येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती शिराळा, पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी १ आरळा यांच्या संयुक्त विद्यमाने पशु वंधत्व शिबीर संपन्न झाले. या शिबीरामध्ये वांझ तपासणी, गर्भ तपासणी, माजावर न येणे, जंत नाशक, गोचीड नाशक अशा १३७ जनावरांच्यावर तपासण्या करुन उपचार करण्यात आले. या शिबीरासाठी शिराळा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के.जाधव, सागाव पशुवैदयकिय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.टी. पाटील, आरळा पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी १ चे पशुधन विकास अधिकारी, व्रणोपचारक एम.एस.तेली, पर्यवेक्षक प्रमोद सुतार, संकेत आटुगडे व पशुपालक नागरिक उपस्थीत होते.