तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
कवठेएकंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी शंकर विठ्ठल पाटील तर उपाध्यक्षपदी संजय परशराम कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडी दरम्यान भाई शंकरराव माळी प्रा. बाबुराव लागारे, सूर्यकांत पाटील, सरपंच राजेंद्र शिरोटे, संजय थोरात, विठ्ठल कुंभार, जयसिंग पाटील, विजयराव पाटील, अशोक माळी, शरद लगारे, चंद्रकांत कुलकर्णी, अशोक जाधव, बबन नागजे, विनोद लगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी अध्यक्ष दादासाहेब पडळकर, माजी उपाध्यक्ष धोंडीराम नागजे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सचिव संभाजी पाटील यांनी आभार मानले.

