शिराळा, दि.3 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवितेमधून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव रसिकाना येतात, त्यामुळे त्यांचे जीवन जगण्याची दृष्टी व्यापक होते. म्हणून कविता माणसाला जगायला शिकविते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी यांनी केले. ते पणुब्रे वारुण ता. शिराळा येथे पार पडलेल्या डोंगरी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. डोंगरी साहित्य संमेलनातून कसदार लेखन करणारे अनेक कवी पुढे येत आहेत.शेतकरी कष्टकरी, समान्यमाणूस,स्त्रिजीवनाच्या दुःखवेदनासह आजचे राजकीय, सामाजिक वास्तव कवितेतून व्यक्त होत आहे ही समाधाची बाब आहे. यावेळी झालेल्या कविसंमेलात ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील, सुभाष कवडे, मनीषा पाटील, वसंत पाटील, माधुरी मरकड, नथुराम कुंभार, भगवान पाटील यांच्या कविता रसिकांची दाद मिळवून गेल्या. संजय नायकवडी, रिजवाना मुल्ला, कोमल मस्कर, बजरंग गावडे, माणिक पाटील, भीमराव कुंभार यांच्या कविता लक्षनीय होत्या. निर्मला पाटील, सोमनाथ पाटील, विलास कुपवाडकर, अरुणा नायकवडी यांचेसह तीसहून आधिक कवीनी कविता सादर केल्या. तसेच राज पाटील, हर्षवर्धन इंगळे, सानिका गुरव आर्या काळे या बालकवी नी बहारदार कविता सादर केल्या. कविसंमेलाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी सुभाष कवडे यांनी केले तर कवी नथुराम कुंभार यांनी आभार मानले.
