शिराळा, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा – नथुराम कुंभार) विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कागदांच्या तुकडयातून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब यांची रांगोळी, शब्दचित्रे, स्केच, रांगोळी माध्यमातून चित्रे साकारली आहेत. वृत्तमानपत्रे, रंगीत कागदांचे तुकडे यांच्या माध्यमात तयार केलेली बाबासाहेबांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नावीण्यपूर्ण कलाप्रकारात चित्रे तयार करण्याचा डाॅ. डाकवे यांचा हातखंडा आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचे “कोलाज” या कलाप्रकारात हे चित्र केले आहे.
