कोल्हापूर, दि.7 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विरोधी आघाडीच्या वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्ती घुसून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना दमदाटी केली, लोकशाहीच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी आपले खरे रूप दाखवून दिले. राजाराम कारखाना कार्यस्थळावर रात्री अकराच्या सुमारास कारखान्याचे प्रमुख कार्यालय फोडून कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांचा बेत होता असा आरोप दिलीप पाटील यांनी केला. दरम्यान, पण त्यांचा हा आरोप तथ्यहीन असून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच असे आरोप केले जात आहेत असे आमदार सतेज पाटील गटाचे संदीप नेजदार यांनी म्हटले आहे. विरोधकांकडे थोडी देखील नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी खोट्या तक्रारी देण्यापेक्षा निवडणूक रिंगणात समोर येऊन लढावे असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला आहे. राजाराम कारखान्याच्या परिसरात रात्री उशिरा काही कार्यकर्ते घुसले होते. हे प्रकरण दोन्ही गटाकडून ताणले जात आहे. याबाबत महाडिक गटाचे दिलीप पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वीच कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे . मुद्दाम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री अप रात्री येऊन कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये दहशत वाजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. सभासदांच्या हक्काची भाषा करणाऱ्या विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, पण पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता गुंडगिरीवर उतरले आहेत अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली. राजाराम कारखान्याच्या परिसरात रात्री उशिरा काही कार्यकर्ते घुसले होते. हे प्रकरण दोन्ही गटाकडून ताणले जात आहे. याबाबत महाडिक गटाचे दिलीप पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वीच कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे . मुद्दाम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री अप रात्री येऊन कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये दहशत वाजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. सभासदांच्या हक्काची भाषा करणाऱ्या विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, पण पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता गुंडगिरीवर उतरले आहेत अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची मर्यादा ओलांडली असून राजाराम कारखाना प्रशासनाची नाहक बदनामी चालवली आहे, असा आरोप महाडिक यांनी केला. प्रचार दौऱ्यात बोलताना ते म्हणाले, सुट्टीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार विरोधकांकडून होत आहेत, यावर कळस म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा धादांत खोटा आरोप या तक्रार अर्जात करण्यात आला आहे. निवडणूक यंत्रणा आणि कारखाना प्रशासन या दोघांवर दबाव आणण्याचे षडयंत्र विरोधकांकडून सुरू आहे.यावेळी संजय पाटील, तुकाराम पाटील, राजाराम पाटील ,विश्वास पाटील, मारुती पाटील, मानसिंग पाटील ,धोंडीराम पाटील ,विष्णु सावंत ,दगडू सावंत, पांडूरंग पाटील, हेंमत पाटील ,आनंदा पाटील, यशवंत पाटील, जयसिंग पाटील, गोपाळ पाटील, गोविंद पाटील, लक्ष्मण पाटील, यशवंत आगरे, बाळू यादव , राजाराम पाटील, संजय कोलते, आंनदा खोत, प्रकाश पाटील, शंकर कदम, हरी पाटील, गणशे शेळके, तुकाराम कदम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावर काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी कोणालाही दमदाटी किंवा धक्काबुक्की केलेली नाही. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच विद्यमान चेअरमन दिलीप पाटील यांच्याकडून आरोप केले जात आहेत असा पलटवार आमदार सतेज पाटील गटाचे माजी नगरसेवक डॉ संदीप नेजदार यांनी केला आहे.चेअरमन दिलीप पाटील यांनी आरोप केला आहे की अंधाराचा फायदा घेत विरोधकांनी राजाराम कारखान्यात चोरासारखे घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा आरोप तथ्यहीन असून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच असे आरोप केले जात आहेत असे नेजदार यांनी म्हटले आहे.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये छाननीच्या वेळी आदल्या दिवशी कारखाना प्रशासनाने रात्रभर जागून खोटी कागदपत्रे तयार करून आमच्या आघाडीच्या तगड्या उमेदवारांचे अर्ज छाननीतून बाद करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नेजदार यांनी दिली आहे.नेजदार पुढे म्हणाले की, त्यामुळे आम्ही रीतसर प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे अपील दाखल केले. या अपीलावर मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळेला आमच्या वकिलांनी पुन्हा नवीन आणि भक्कम असे मुद्दे आणि पुरावे सादर केले. आमच्या उमेदवारांचे अर्ज पात्र होऊ नयेत यासाठी कारखान्याने काल रात्री बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न चालवला असल्याची माहिती आमच्या कार्यकर्त्यांना मिळाली. याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यासह कारखाना कार्यस्थळावर गेलो. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सुद्धा उपलब्ध आहे. त्यावेळी कुणालाही धक्काबुक्की केली नाही. असे असताना चेअरमन हे धंदांत खोटे बोलत आहेत असे नेजदार यांनी म्हटले आहे.