तासगाव तालुक्यातील घटना, बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीस अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी
तासगाव, दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज)
तासगाव तालुक्यातील कुमठे येथील एका निवासी दिव्यांग विद्यालयात अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थ्यावर शिपायाने अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी शिपायावर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सा)अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संबधित शिपायास अटक केली असून त्याची तीन दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.
या बाबत आधिक माहिती अशी कि, पिडीत विद्यार्थी हा दिव्यांग असुन तो सहावीत शिकत आहे. तो इतर विद्यार्थ्यांच्या सोबत कुमठे ता. तासगाव येथील निवासी दिव्यांग विद्यालयात शिकत आहे. तर संशियीत आरोपी हा त्याच विद्यालयात काळजीवाहू राखणदार शिपाई आहे. संबधित शिपायाने पिडीत विद्यार्थ्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तो झोपला असता रविवारी ५ फेब्रुवारी च्या मध्यरात्री त्याच्यावर तोंड दाबून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी काही विद्यार्थी जागे झाली त्यांनी विरोध केला असता संशयित शिपायाने पिडित व इतर विद्यार्थ्यांना मारहाण करून हा प्रकार कोणास सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.
या नंतर घटनेतील पिडीत विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिपायाच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सा) ४,५,(फ),५(क ),६,८,१२ व अपंग व्यक्तीचे अधिनियम २०१६ चे कलम ९२ तसेच भा.द.वि.स.३७७,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान त्यास अटक केली असून त्यास तासगाव प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर उभे केले असता त्याची तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेचा सर्वच स्थरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत.
