सांगली, गुरुवार दि.6 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कुमठे येथील युवक संदीप परशुराम माळी (वय – 34 वर्षे) हा बुधवारी 6 जुलै 2023 पासून बेपत्ता झाला आहे. संदीप हा गेली 10 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. बुधवारी सकाळी 10.30 वाजता संदीपला त्याची आई मंगल माळी या उपचारासाठी सांगली येथील कोल्हापूर रोड ला असलेल्या गुप्ते हॉस्पिटल येथे घेऊन गेल्या होत्या. आई मंगल यांनी त्यास हॉस्पिटल च्या वेटिंग रूम मध्ये थांबवून हॉस्पिटल मध्ये नंबर लावण्यासाठी गेल्या असता, संदीप तेथून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी. मंगल माळी यांनी सांगली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बेपत्ता ची नोंद झाली आहे. संदीप हा मानसिक आजारी असून शारीरिक दृष्टया प्रकृती धष्टपुष्ट आहे. रंग गोरा असून, उंची 5 फूट 5 इंच आहे, चेहरा गोल असून नाक मोठे आहे, डोळे काळे असून, डोक्याचे केस दाट व काळे आहेत. दाढी – मिश्या दाट व काळी आहे. उजव्या हातावर मारुतीचे चित्र गोंदलेले आहे. अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट परिधान केलेला आहे. या बाबत कोणास माहिती मिळाल्यास सांगली पोलिस किंवा 9766807589 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
