शिराळा, दि.17 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
कुसळेवाडी ता. शिराळा येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल कोसळला आहे त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पुल कोसळताना कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही पुल कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली असुन स्थानिक नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे
या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीचे काम व्हावे यासाठी गेल्या दहा वर्षापासुन कुसळेवाडी ग्रामपंचायत संबधीत विभागाशी पञ व्यवहार करत आहे.परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने आज पुल कोसळला आहे अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांच्यातुन व्यक्त होत आहेत
कुसळेवाडी हे गाव एक हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाजवळुन बारमाही वाहणारा वारणा डावा कालवा गेला आहे.गावची नव्वद टक्के शेतजमीन तसेच दहा कुटुंब देखील पुलाच्या पलीकडे रहात आहेत.त्यामुळे याच पुलावरुन दिवसा राञी नेहमी वर्दळ सुरु होती.कुसळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे,उपसरपंच वसंत नाईक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी यापुर्वी संबधित प्रशासनाला पञव्यवहार केला आहे त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष घालणार का? असा सवाल सर्व सामांन्यातुन व्यक्त होताना दिसत असुन या ठिकाणी संबधीत विभागाने नवीन पुल व्हावा अशी मागणीही जोर धरत आहे.

