कौलगे मध्ये तृणधान्य वर्षे अभियान

तासगाव, ता.3 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी तासगाव यांचे मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्य विकासाची सप्तसुत्री चे आयोजन तासगाव तालुक्यातील कौलगे येथे करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अमृतसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक स्वाती बास्ते यांनी तृणधान्यांची ओळख करून दिली यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोडो, सावा इ. पौष्टिक धान्याची माहिती दिली. त्याचबरोबर महाडीबीटीवरील कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यात कृषी यांत्रिकीकरण, वैयक्तिक शेततळी, शेततळी अस्तरीकरण, ठिबक सिंचन , अनुदानावर बियाणे ई. विषयी चर्चा केली.
सूक्ष्म अन्नधान्य प्रक्रिया योजनेविषयी सविस्तर माहिती बास्ते यांनी कौलगे गावातील शेतकरी बंधू आणि भगिनी यांना दिली यावेळी कौलगे गावचे सरपंच रणजीत माने, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनंदा पाटील , सौ. सुजाता कबाडे, पोलीस पाटील दौलत पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.