क्रांती कारखान्यावर एलआयसी विमासेवा शिबीर संपन्न

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल ता. पलूस येथे एलआयसीचे विमासेवा कॅम्प शिबिर उत्साहात संपन्न झाले. भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा तासगांव व क्रांती अग्रणी जी डी बापू लाड साखर कारखाना, कुंडल ता. पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा दोनशे कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या शिबिराच्या नियोजनासाठी कारखान्याचे चेअरमन आमदार अरूण आण्णा लाड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कारखान्याचे संचालक श्री गव्हाणे, तासगांवचे शाखाधिकारी शशिकांत दाभाडे, उपशाखाअधिकारी सुरेंद्र शिंदे, वेतन बचत विभागाचे संतोष गावडे, कुंदन सावंत, श्री सादिगले, कारखान्याचे इंजिनियर श्री. माने, एडमिन ऑफिसर श्री.देशमुख, सिक्युरिटी ऑफिसर श्री. लाड, विमा प्रतिनिधी बी आर पाटील, ज्योती तोडकर, संजय जाधव , एलआयसीचे विकास अधिकारी नितीन खरात आदी मान्यवर उपस्थित होते.