क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण करू – खा. संजय काका पाटील

कवठे एकंद, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – प्रदीप पोतदार) शेती आपल्या आयुष्याची भाकरी आहे. शेतीचे संवर्धन काळाची गरज आहे. शेती व जमिनीची सुपीकता टिकवता आली तरच शेतकरी टिकणार आहे. शिवारातील क्षारपड समस्येच्या बाबतीत उपायोजना करण्यासाठी क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण लवकरच करून उपाययोजना करू. अशी ग्वाही खासदार संजय काका पाटील यांनी कवठे एकंद येथे बोलताना दिली. कवठे एकंद येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ कार्यक्रमावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, शेकापचे जिल्हा चिटणीस शरद पाटील, सरपंच राजेंद्र शिरोटे उपस्थित होते. कवठे एकंद येथे जल जीवन मिशन अंतर्गत 4कोटी 65 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ तसेच गावातील माजी सैनिक संघटनेच्या इमारतीचे उद्घाटन, अंबाबाई मंदिर परिसरात प्लेविंग ब्लॉक, पार्श्वनाथ जैन मंदिर सभागृह, ग्रामसचिवालय सभागृह अशा विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामासाठी सहकार्य लाभलेबद्दल खासदार संजय काका पाटील, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. वकिली परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल शशिकांत गुरव यांचा सत्कार खा. संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमा वेळी स्वागत सरपंच राजेंद्र शिरोटे, प्रास्ताविक विनोद लगारे, मनोगत दीपक घोरपडे,सूत्रसंचालन विक्रांत पाटील आभार दीपक जाधव यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी विजय मस्कर,उपसरपंच जयश्री पाटील,बाळासाहेब पवार, प्रा.बाबूराव लगारे,बाळासाहेब शिरोटे, अशोक माळी ग्रामविकास पॅनेलचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.