सांगली, दि.२९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)
सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय काका पाटील यांच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार संजय काकांच्या स्नुषा सौ शिवानी प्रभाकर पाटील यांच्या प्रथम मकर संक्रांती या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव, चिंचणी, विटा, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी हे समारंभ उत्साहात पार पडले, सर्वच ठिकाणी महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम स्थळी महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना खासदार पत्नी सौ. ज्योतीताई पाटील व स्नुषा सौ शिवानी पाटील यांच्या कडून संक्रांतीचे वाण देण्यात आले. यावेळी ज्योतीताई पाटील यांनी पुढच्या काळात जिल्ह्यातील महिलांसाठी खासदारांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे सांगितले.

