शिराळा, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) खोतवाडी (ता.शिराळा) येथे श्री.संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिम्मित्त आयोजीत करण्यात आलेला अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोनवडेपैकी खोतवाडी येथे झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती, भजन हरीपाठ, किर्तन यासारखे दैनदिन कार्रक्रम पार पडले तसेच पारायण कालावधीमध्ये ह.भ.प शिवाजी महाराज भोसले(कोरेगाव), ह.भ.प-बाजीराव महाराज (भाडुगळेवाडी), सुभाष महाराज(शिवाजीनगर), शंकर मोरे महाराज(आंबवडे), नारायण महाराज सलते(सलतेवाडी), अनंत महाराज(शिखरवाडी), पुरुषोत्तम महाराज पाटील(आळंदी), बाजीराव महाराज जाधव(सोनवडे) आदींनी किर्तनातुन ज्ञानदान केले. खोतवाडी येथील पारायण सोहळ्यामध्ये एकनाथ महाराज, बाजीराव महाराज, सोपान महाराज आदि मंडळी व्यासपीठचालक म्हणुन काम पाहीले याचबरोबर या पारायण सोहळ्यासाठी समाजसेवक शंकरदादा मोहीते यांचे या सप्ताहासाठी विशेष सहकार्य लाभले. पारायण सोहळ्याच्या निम्मीत्ताने खोतवाडी गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी च्या गजरात दिंडी सोहळा काढण्यात आला. यावेळी गावातील महीला पुरुष युवक पारंपारीक वेश परीधान करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी मृदंगवादक – प्रमोद कुंभार यांनी मृदंग वादनाने पारायण सोहळ्यातील किर्तनात रंगत भरली तसेच या सोहळ्यासाठी सांप्रदायीक, सामाजीक, राजकीय, क्षेत्रातील विविध मंडळींनी भेटी देवुन शुभेच्छा दिल्या. खोतवाडी येथील पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी एकनाथ राणे, दिपक राणे, सोपान खोत, लक्ष्मण खोत, वसंत मोहीते, तुकाराम खोत, यशवंत खोत, दिलीप खोत, अशोक खोत, शंकरदादा मोहीते, लक्ष्मण कंदारे यांच्यासह खोतवाडी पारायण मंडळाने व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

