तासगाव पोलिसांची कामगिरी, सव्वीस लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक, दोघेजण फरार
तासगाव, दि. 29 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यासह इतर गावात सोळा ठिकाणाहून अधिक घरफोडया करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश मिळाले. या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली तर दोघे फरार आहेत. अटक केलेल्या टोळी कडून सुमारे सव्वीस लाख रुपये हुन अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये साडे अठरा लाख रुपयेचे सोन्याचे दागिने, एकसष्ठ हजार रुपयेचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेला सात लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंट टेम्पो एम. एच.10 सी. आर. 1970 असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जितेंद्र दगडू काळे (वय – 48), संजय जंगप्पा काळे (वय – 40) व निहाल जितेंद्र काळे (वय – 19) सर्व रा. करणगी ता.आटपाडी या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर रोहित पवार रा.करगणी ता.आटपाडी व सनी अर्जुन शिंदे रा.फलटण जि.सातारा हे दोघेजण फरार आहेत. या प्रकरणी अनिल मारुती पाटील रा. बलगवडे ता.तासगाव यांनी फिर्याद दिली आहे. या टोळीने अनिल पाटील यांच्या घरातून फेब्रुवारी 2023 मध्ये घरफोडी करून दागिने लंपास केले होते. तेव्हा पासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. यासह इतर गुह्यात सहभागी असलेले आरोपी करगणी येथे असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले त्यांच्या कडून दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव तारडे, अमोल चव्हाण, अमरसिहं सूर्यवंशी, समीर आवळे, विवेक यादव, सचिन जोंजाळ, योगेश जाधव, पवन जाधव, कैप्टन गुंडवाडे, अजय पाटील यांनी केली. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी अभिनंदन केले.
