तासगाव, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
कुमठे ता.तासगांव येथील चंद्राबाई महादेव एडके (वय 72 वर्ष) यांचे सोमवारी 6 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कुमठे श्रीकृष्ण ग्राम विकास सोसायटीचे व्हा चेअरमन व शिवप्रतिष्ठान कुमठे चे प्रमुख संजय एडके व सुरेश एडके यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार 8 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कुमठे येथे होणार आहे.
