चिखलगोठण मध्ये एकास बेदम मारहाण

अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तमाशातील भांडणा वरून दोघांनी केली मारहाण



तासगाव, ता. ८ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील चिखलगोठण या गावातील तमाशात दंगा का केला असे म्हणून एकास दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारामारीत अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याची तक्रार तासगाव पोलीसात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चिखलगोठण या गावाची यात्रा होती या मध्ये तमाशात दंगा का केला असे म्हणून जाब विचारून अजित हणमंत पवार व अवधूत मारुती सुतार दोघे रा. चिखलगोठण यांनी अमित संजय पवार यास ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे एकांतात गाठून बेदम मारहाण केली. या मारामारीत अमित पवार यांची अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन अंदाजित किंमत 25हजार रुपये लंपास केली आहे.
वा प्रकरणी अमित पवार यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अजित पवार व अवधूत सुतार यांच्यावर भा. द. वि. स. 392 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.