शासकीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान
तासगाव, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने तासगांव शहरातील विविध शासकीय कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेचे विभागीय संघटक मिलिंद सुतार व पवन गंगवणी यांच्या हस्ते शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण यासह इतर कार्यालयातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तासगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा बजरंग झेंडे, नगर परिषद मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक श्वेता कुंडले, बांधकाम विभागातील विद्या शेटे, तालुका पुरवठा निरीक्षक जयश्री माने पाटील यांच्यासह इतर महिला अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होते. मिलींद सुतार यांनी महिला दिनाचे औचित्य सांगून महिलांच्या अविरत आणि खडतर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगितले


