टनामागे 200 किलोची चोरी करणाऱ्यांनी राजारामच्या काट्याविषयी बोलू नये – शिवाजी रामा पाटील

कोल्हापूर,दि.11 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्यांनी तुमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घातला असे लोक आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचे पाय धरायला येत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. असे आवाहन अमल महाडिक यांनी केले. राजाराम कारखाना बोलताना निवडणूक प्रचारात बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. गगन बावड्याच्या डी वाय कारखान्यात टनामागे 200 किलो उसाची राजरोसपणे चोरी होते. अनेक ट्रॅक्टर चालक याबाबत खाजगीत बोलत असतात. पण विचारणार कोण म्हणून ऊस पुरवठा करणारे शेतकरी गप्प बसतात. याउलट राजाराम कारखान्याच्या काट्यावर केलेले वजन बिनचूक येते, याचा प्रत्यय सभासदांना आला असल्यामुळे दरवर्षी कारखान्याला सभासद जास्तीत जास्त ऊस घालत असतात. जे गगनबावड्यात घडतय ते कसबा बावड्यात होऊ देणार नाही असा इशाराही शिवाजी पाटील यांनी दिला. यावेळी जयसिंग खामकर, के.पी.चरापले, सदाशिव कोरे, विश्वास बिडकर, मारुती पाटील, पंकज पाटील, मारुती नलवडे, सुभाष गुरव यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.