डिजिटल मीडिया परिषद च्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी “महाराष्ट्र मराठी न्यूज” चे संपादक संजय माळी यांची निवड

सांगली, दि. 3 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी “महाराष्ट्र मराठी न्यूज” चे संपादक संजय माळी यांची निवड करण्यात आली. डिजिटल मीडिया परिषदेच्या नुकत्याच सांगली येथे झालेल्या “डिजिटल माध्यमे आणि कायदे” या विषयावरील आयोजित कार्यशाळेमध्ये ही निवड करण्यात आली. डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, दैनिक लोकमत सांगली आवृत्तीचे संपादक हनुमंत पाटील, परिषदेचे कायदेशीर सल्लागार ऍड.महादेव बन्ने, शिवाजी विद्यापीठाचे पत्रकारिता अध्यासनचे समन्वयक प्राध्यापक डॉ.शिवाजीराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी डिजिटल डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी तानाजीराव जाधव, सांगली जिल्हाध्यक्षपदी कुलदीप देवकुळे, कार्याध्यक्षपदी अभिजीत शिंदे, मोहन राजमाने, उपाध्यक्षपदी मोहसीन मुजावर, अक्रम शेख, प्रकाश सूर्यवंशी, चिटणीसपदी नजीर सय्यद, सरचिटणीसपदी रमेश सरडे, सल्लागारपदी तानाजीराव जाधव, अनिरुद्ध पाटील यांच्यासह तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी जत, शिराळा, कवठेमंकाळ, वाळवा आणि मिरज या तालुक्याच्या कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, मास कम्युनिकेशन चे विद्यार्थी उपस्थित होते.