डॉल्बीच्या आवाजाने कवठेएकंद येथे युवकाचा मृत्यू

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी घडली घडली घटना

तासगाव, दि.26 सप्टेंबर 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) डॉल्बीच्या प्रचंड अश्या कर्णकर्कश आवाजामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद या गावातील एका गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत घडलेला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेखर सुखदेव पावसे (वय – 32 वर्षे)असे या युवकाचे नाव असून दहा दिवसापूर्वी त्याची हृदय शस्त्र क्रिया झाली होती. डॉल्बीच्या दणदणटाने एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या सर्वत्र गणपती विसर्जनाचीच धामधूम चालू आहे. ढोल, ताशे, लेझीम, झाँज या पारंपरिक वादयाच्या तालावर थिरकणाऱ्या युवकांना डॉल्बी आणि डीजे ने चांगलेच वेड लावले आहे. एकमेकांच्या इर्षेवर मोठमोठाले डॉल्बी लावून कर्णकर्कश गाणी सरास लावली जात आहेत. त्या आवाजाने अबाल-वृद्ध, रुग्ण, गरोदर महिला, यांना किती त्रास होतोय याचा कधीच कोण विचार करीत नाहीत. याच कर्णकर्कश आवाजाने कित्येक जणांचे प्राण गेले आहेत. असाच प्रकार काल कवठेएकंद येथे घडला नुकतेच अँजिओप्लास्टी झालेल्या शेखरला आपला जीव गमवावा लागला आहे. शेखर छान चारचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यास चार वर्षाची एक लहान मुलगी सुद्धा आहे. त्याचे 10 दिवसापूर्वीच हृदयाचे ऑपरेशन झाले होते. काल रात्री गावात एका गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती, त्यावेळी डॉल्बीच्या आवाज एकूण शेखर मिरवणुकीत गेला. मिरवणुकीतुन माघारी घरी आल्या नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यास चक्कर आली. यावेळी उपचारासाठी त्यास रुग्णालयात दाखल केले. पण अतिकर्णकर्कश आवाजाने शेखर ला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने जरी सर्वत्र हळहळ व्यक्त होत असली तरी आपल्या असल्या अघोरी उत्सवप्रिय वागण्याने अजून किती जणांचे आपण बळी घेणार आहोत. आणि अशा प्रकारला आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी काय पावले उचलणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे.