डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय संशोधक गुणवत्ता पुरस्कार

तासगाव, दि.2 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांना पर्यावरण संशोधन कार्याबद्दल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्यावरण शास्त्र अकादमीच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संशोधक गुणवत्ता पुरस्कार'(मानचिन्ह व प्रमाणपत्र ) प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ.नरेंद्र कुलकर्णी गेली अनेक वर्ष खारफुटी विषयक संशोधन करीत आहेत त्यांचे आत्तापर्यंत २० शोधनिबंध व १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच शासनाच्या व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विविध समित्यांवर ते काम करीत आहेत. त्याचबरोबर ‘कुमार विश्वकोश’ साठी त्यांनी लेखन केले आहे. या अगोदर त्यांना ‘आदर्श शिक्षक ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादात विषय तज्ञ व निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिव शुभांगीताई गावडे , सीईओ कौस्तुभ गावडे, सहसचिव डॉ.राजेंद्र शेजवळ व एस.एम. गवळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, उपप्राचार्य डॉ. शंकर खाडे, प्रा.जे.ए.यादव, डॉ.सुरेश खाबडे, अधीक्षक एम.बी. कदम यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.