सांगली, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश आलगोंडा पाटील (वय-७६ वर्षे) यांचे दि.५ मार्च रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांचे मुळगाव शिरगाव कवठे (ता. तासगांव) असून त्यांनी सांगलीत सोना आलगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सोना क्लिनिक व हाॅस्पिटलच्या माध्यमातून गेले ४० वर्षे वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे सेवा योगदान दिले आहे. दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, पदवीधर संघटना, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी अशा संस्थेत काम केले असून आर्थिक सहयोगही दिला आहे. ट्रस्टच्या वतीने गोरगरीब जनतेची सेवा अखंडितपणे केली आहे. आजही ट्रस्टच्या वतीने व्यसनमुक्ती केंद्र व मोफत रुग्णसेवा सुरू आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेवून शासनाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदर्श धन्वंतरी पुरस्कार, समाजभूषण, जीवनगौरव, सन्मतीसेवा पुरस्कार तसेच आण्णा भाऊ साठे सामाजिक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम व माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. स्ट्रोक सर्जन डॉ. अश्विनीकुमार पाटील व डॉ. अश्विनी पाटील (डॉ. आरती मेंच) यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सुन नातवंडे असा परिवार आहे.
