तासगावात द्राक्ष दलालाकडून चाळीस लाखांची फसवणूक

वीस शेतकऱ्यांना गंडा, व्यापारी फरार, एजंटावर गुन्हा दाखल

तासगाव, दि.८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील २० शेतकऱ्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी “पप्पू  उर्फ रिझवान मलिक शेठ फरार असून द्राक्ष एजंट  – दिलीप माळी यास तासगाव पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. तासगाव पोलिसात रात्री उशिरा  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पांडुरंग महादेव जमदाडे, संतोष बबन जमदाडे, सुभाष रामचंद्र एरंडोले, परशराम वसंत एरंडोले, अनिल बबन चव्हाण, वसंत पंडित लांडगे, रवींद्र नामदेव जमदाडे, गोविंद बाबा भोसले, उदय रघुनाथ भोसले, विजय उर्फ कुंडलिक लक्ष्मण लांडगे, रमेश अर्जुन लांडगे, अमोल नारायण माने, प्रकाश तुकाराम कलढोणे, सदाशिव पांडुरंग कळढोने, विनायक कृष्णराव कांबळे, मौला जलालुद्दीन मुजावर, संदीप हनुमंत बेडगे व राम प्रभाकर पवार यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी संशयित दलालांनी वरील शेतकऱ्यांची २२ जानेवारीपासून मणेराजुरीत चालू हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. मात्र द्राक्ष घेऊन गेल्या पासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालानी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी  पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी “पप्पू  उर्फ रिझवान मलिक शेठ फरार असून द्राक्ष एजंट  – दिलीप माळी याला तासगाव पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. तासगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .