तासगावात निर्भय मॉर्निंग वाॅकद्वारे दाभोलकरांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम, 25 लोकांचा देहादानाचा संकल्प

तासगाव, रविवार दि.20 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय माॅनिग वाॅकद्वारे दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी देहदान संकल्प पत्र वाटप करण्यात आले. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन 10 वर्षे होऊन ही याचा मुख्य सुत्रधार अजुनही मोकाटच फिरत आहेत त्यांना पकडून शिक्षा व्हावी यासाठी तासगाव अंनिस शाखेच्या वतीने अहिंसात्मक मार्गाने आंदोलन गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू आहेत, हा लढा न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार असल्याच्या निर्धाराने कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ.दाभोळकरांच्या विचारांचा जागर जणमाणसात रूजविण्यासाठी काम करत राहू हीच खरी आदरांजली ठरेल असे मत प्रा. डॉ बाबुराव गुरव यांनी मांडले, यावेळी देहदान संकल्प पत्राचे वाटप करताना पंचवीस कार्यकर्त्यांनी आपला देहदानाचा संकल्प घेतला. यावेळी कमांडो करीयर अकॅडमी चे संचालक जाधव व विद्यार्थी, राष्ट्रसेवा दल, स्वराज्य पक्ष जिल्हा अध्यक्ष शशीकांत डागे, वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी गुळवे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव, का्ॅग्रेसचे सचिन पाटील, शरद शेळके, मनोज पाटील, डॉ.सतिश पवार, अंनिस शाखेच्या अध्यक्ष छायाताई खरमाटे, उप अध्यक्ष हेमलता बागवडे, संचिता सावंत, रविंद्र सावंत, शंकर पाटील, अंकुश जाधव, विकास यादव, राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे, वैभव गुरव, अविनाश घोडके, समीर कोळी, सुधीर नलवडे, सचिन जाधव, प्रा वासुदेव गुरव, ज्योती गुरव, शिवांश गुरव, ऋतुजा खोत, वैष्णवी यादव, विशाल खाडे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन अंनिस कार्य अध्यक्ष अमर खोत केले आभार अंनिस जिल्हा अध्यक्ष भाई बाबुराव जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन अध्यक्ष अमर खोत केले तर आभार बाबुराव जाधव यांनी मानले.