तासगावात मोरूच्या मावशीने नाट्य रसिकांची मने जिंकली.

तासगाव महोत्सवची दमदार सुरवात, भरत जाधवच्या अभिनयाने तासगावकर मंत्रमुराद हसले, नाटकाचे यशस्वी २ हजारहून अधिक प्रयोग

तासगाव, दि.३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा- विनायक कदम)

दोन हजार हुन अधिक यशस्वी प्रयोगातून रंगभूमीवर वेगळी छाप पाडणाऱ्या मोरूची मावशी या अभिनेता भारत जाधव याच्या बहुचर्चित नाटकाचा प्रयोगाला तासगावात हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला. तासगाव महोत्सवाच्या दिमाखदार प्रारंभात साने गुरुजी नाट्यगृहात रंगमंचावर मोरूच्या मावशीने धुमाकूळ घातला. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव महोत्सवा अंतर्गत या नाटकाचे नियोजन केले होते.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या  लेखणीतून उतरलेलं व रंगमंचावर धुमाकूळ घालणार नाटक म्हणजे मोरूची मावशी. हे नाटक म्हणजे रंगभूमीवर विणलं गेलेले तलम वस्त्र!  व या तलम वस्त्रावर आदी  ‘विजय’ मुद्रा उमटली, पण या नाटकात नव्यानं ‘भरत काम करण्यात आलंय. या साऱ्याचं श्रेय भरत जाधवला दयावं लागलं. रंगभूमीवरचं ही अजरामर नाटक! पण मावशीच्या नखरेल अदा भरतन नाजूक रंगवल्या आहेत. बंड्या ते मावशी हा प्रवास खतरनाक झालाय.  नाटकात  मावशी रसिकांवर मोहिनी घालत आसतानाच, भरतने यातलं बंड्याचं पात्रही तितक्यात तन्मयतेने साकारलंय. टायमिंगचा उत्तम सेन्स तर त्याच्या अंगात आहेच. नाटकात अशोक पत्की यांच संगीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘टांग टिंग टिंगा…’ या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक केलंय. नाटकात कांदा संस्थानच्या राणीच्या म्हणजे मोरूच्या मावशीच्या भूमिकेचं शिवधनुष्य  भरतनी पेललंय. पुरुषांनं फिल्ममध्ये स्त्री भूमिका करणं व नाटकात स्त्री भूमिका करणे यात फरक आहे. नाटकासारख्या जीवंत कलेत हजारो प्रेक्षकांच्या समोर स्त्री भूमिका करणं खूप अवघडंच काम आहे. पण भरत जाधव ने हि भूमिका अत्यंत ताकदीने पेलली आहे.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तासगावच्या नागरिकांना साहित्य व सांस्कृतिक मेजवाणीसाठी तासगाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत या महोत्सवासाठी मदत करणाऱ्या मंडळींसह नगरपालिकेच्या साऱ्या टीमला धन्यवाद दिले. अभिनेता भरत जाधव याने या नाट्यगृहाच सुंदर काम करून स्थानिक कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचे कौतुक केले. यावेळी प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार रवींद्र रांजणे, मिरज पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते