तासगाव, बुधवार दि.7 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील क्रांती फौंडेशनच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी क्रांती दिनाचे औचित्याने रन फॉर क्रांती 1942 या धावण्याच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेत एकूण 850 खेळाडूनी सहभाग नोंदवला त्यात दिल्ली च्या खेळाडूंचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. कोल्हापूर, सातारा, पुणे व सांगली जिह्यातील खेळाडूनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र अथलेटीक असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पाटील, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते युवराज खटके, बापू समलेवाले, गणेश सिहासने, माजी नगरसेवक गजानन खूजट, बाळासाहेब सावंत, सांगली जिल्ह्यातील माजी राष्ट्रीय खेळाडू सुभाष सूर्यवंशी, समीर सनदी, विकास व्हानमाने, अभिजित पाटील, अविनाश लाड, संतोष पाटील, राजेंद्र कोडलापगोल, अनिल सोनंदकर तसेच क्रांती फौंडेशन चे संचालक मंडळ आणि मार्गदर्शक तसेच तासगाव चे सर्व पोलीस दलातील माजी खेळाडू, मायभूमी फौंडेशन चे सर्व संचालक, आर आर पाटील क्लब तासगाव चे पदाधिकारी, सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे सदस्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तूरची प्रशिणार्थी यांनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

