तासगाव कृषी विभागाच्या वतीने हुरडा उत्सव संपन्न

तासगाव, दि.३ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

तासगाव तालुक्यातील नागाव (कवठे) येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत हुरडा उत्सव संपन्न झाला.

यावेळी विटा येथील उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी मानवी आहारातील पौष्टीक तृणधान्यचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवी आरोग्य विकारांनी ग्रस्त झाले आहे. मानवी आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्यचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 2023हे वर्ष आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याचे सांगितले.

यावेळी तासगाव तालुका  कृषी अधिकारी  एस. के. अमृतसागर  यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून सांगितले ‌तसेच तृणधान्यचे आहारातील प्रमाण वाढण्याकरिता हुरडा उत्सव सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या हुरडा उत्सवाचे नियोजन पीक स्पर्धा विजेते  रामचंद्र तुकाराम पाटील, नागाव (क) यांच्या शेतावर करण्यात आले.  यावेळी या परिसरातील शेतकरी नागरिक वाहन चालक  प्रवासी बांधवांनी या हुरडा पार्टीचा  आस्वाद घेतला. अशाप्रकारे ज्वारीपासून हुरडा करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी  एस. के .अमृतसागर यांनी व्यक्त केले.

यावेळी शेतकरी रामचंद्र तुकाराम पाटील, बाळासाहेब पाटील, सावळज मंडळ कृषी अधिकारी आर .आर. पाटील, मणेराजुरी कृषी पर्यवक्षक बी. एन. कोरटे, नागाव कृषी सहाय्यक एस. एस. मोहिते, तासगाव कृषी सहाय्यक हुसैन कदम. वासूंबे कृषी सहाय्यक राहुल माने कृषी सहाय्यक, गव्हाण कृषी सहाय्यक सचिन खरमाटे,  नागाव (क) पोलीस पाटील संजय देसाई तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मणेराजूरी मंडळ कृषी अधिकारी दिपक कांबळे यांनी केले तर आभार नागाव (क) कृषी सहाय्यक एस एस मोहिते यांनी मानले.