तासगावात ग्राहक दिन उत्साहात

राज्य महावितरण कार्यालयात आयोजन


तासगाव, दि.16 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील महावितरणच्या उप विभागीय कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न झाला. तासगाव तहसिल कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग, तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसिलदार नितीन धापसे पाटील, महावितरणचे शाखा अभियंता चैतन्य इनामदार, उपअभियंता सिकंदर मुल्ला, भारत होनमाने, ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे विभागीय संघटक आलमशहा मोमीन, जागृत ग्राहकराजा संघटना, महाराष्ट्रचे विभागीय संघटक मिलींद सुतार, धनंजय मोहिते तसेच सर्व कर्मचारी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.