तासगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

तासगाव, सोमवार दि. 26 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) गेले २ महिने चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या तासगाव तालुक्याच्या शहरासह ग्रामीण भागाला मंगळवारी पावसाने झोडपले. या पावसामुळे शेतकरयांमधुन समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना चांगलेच झोड़पले. यामुळे शेताचे बांध भरून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. तर काही भागात ओढ्या नाल्याना पाणी आले. या पाण्याने द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांसह खरिपाचा शेतकरी सुखावला आहे. पावसाने खरीपाला जीवदान मिळाले आहे. पावसाने द्राक्षबागांच्या खोळंबलेल्या छाटण्या सुरू होणार आहेत. तासगाव शहरासह तालुक्यातील लोढे, बस्तवडे, आरवडे, मांजर्डे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी , वडगाव ,लोकरेवाडी, सावर्डे, मनेराजुरी, खुजगाव , चिंचणी यासह तालुक्याच्या सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील खरीपाच्या पेरलेल्या क्षेत्रावरील पिकाला लांबलेल्या पावसामुळे पाण्याची गरज होती. पावसाने दिलेली उघडीप व पडलेल्या उन्हामुळे खरीप कोमेजत तर काही ठिकाणी संपल्यात जमा आहे. पिकांस पाण्याची गरज होती. पीक पाणी पाणी पाणी करत होते. मात्र कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाल्याने राज्यात दमदार पाऊस पडत आहे. सोमवारी तासगाव तालुक्यात या पावसाने सारीकडे पाणीच पाणी झाले होते. ताली फुटून काही ठिकाणी ओढ्या नाल्याना पाणी आले. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.फोटो:पावसाने भातशेती व द्राक्षबागेत असे पाणी साठले होते.