तासगाव मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी

तासगाव, दि.19(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगांव येथे मुस्लिम समाज व आझाद कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी केली. गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने हा शिवजयंती उत्सव मुस्लिम समाजाच्या वतीने साजरा करण्यात येतो छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कालखंडात ज्या मुस्लिम मावळ्यांनी जे योगदान दिले ते संपूर्ण समाजापर्यंत जावे हाच उद्देश यावेळी स्वागत प्रस्तावित माजी नगराध्यक्ष जाफर भाई मुजावर यांनी केले यावेळी ग्राहक मंचचे अध्यक्ष हाजी आलमशा शेकडे म्हणाले कि छत्रपती शिवरायांचे काळात ज्या मुस्लिम मावळ्यांनी मोलाचं योगदान दिले आहे यामध्ये अंगरक्षका पासून ते खाजगी सचीवा पर्यंत सर्व विश्वासु मुस्लिम मावळे होते ते म्हणाले आज खऱ्या अर्थाने देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची आवश्यकता आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना सर्व जातीधर्माच्या अठरापगड लोकांना सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाच तोरण बांधले ते म्हणाले, त्या काळात जनता इतकी सुखी होती आणि प्रशासन इतके मजबूत होते कि कोणताही अपराध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती याप्रसंगी सर्वश्री दगडुशेठ जमादार परवेज गवंडी इम्तियाज गवंडी आरीफ गवंडी शोहेब मुजावर अरबाज जमादार आरीफ मुजावर निहाल जमादार आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार सिराज भाई तांबोळी यांनी मानले.