तासगाव, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तासगाव नगरपरिषदेच्या सानेगुरूजी नाट्यगृहामध्ये रंगभूमीचे पूजन करणेत आले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून तासगावमधील स्थानिक कलाकारांनी स्थापन केलेल्या नभांत नाट्यसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयीन निरिक्षक श्वेता कुंडले, वरिष्ठ लिपिक राजेंद्र माळी, आरोग्य निरीक्षक आयुब मणेर, सिटी कोऑर्डिनेटर सुहास करळे, पियुष मिर्लेकर, रंगकर्मी चैतन्य हंचनाळकर, सौ. सई येडेकर-कुपाडे, अमेय काळे, सौ. किरण हंचनाळकर, अथर्व खरे, श्रीकुमार माळी, अभिजीत जोशी, भाग्यश्री जोशी, ओमकार वजरीनकर, शिवाजी विद्यापीठ अभ्यास समिती सदस्य हर्षली जाधव, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते.
