तासगाव मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान संपन्न

रक्तदान शिबिराचे आयोजन, यशवंत मोटार ड्रायव्हिंग स्कुलचा उपक्रम

तासगाव, दि.6 फेब्रुवारी 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियाना अंतर्गत वाहन चालक, मालक व प्रवाशी यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील यशवंत मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या वतीने रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन विभाग सांगली कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव यांनी दुचाकी चे सुरक्षित ड्रायव्हिंग व हेल्मेट ची गरज या विषयी मार्गदर्शन केले. तर निरीक्षक विशाल घनवट यांनी चारचाकी चे सुरक्षित ड्रायव्हिंग आणि सीट बेल्ट चे महत्व याविषयी, सहाय्यक निरीक्षक मुळे यांनी रोड चिन्हे त्यांचे प्रकार व दंड, सहाय्यक निरीक्षक स्वप्नाली जाधव यांनी महिलांनी वाहन चालविताना घ्यायची विशेष काळजी व कायद्यातील तरतुदी या विषयी मार्गदर्शन केले. आभार यशवंत ड्रायव्हिंग स्कुल चे संचालक यशवंत माळी यांनी मानले.