शिराळा, मंगळवार दि.25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा)शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगर म्हणून संबोधला जातो गेल्या आठवड्यापासून या परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गास दिलासा मिळाला असुन या परिसरात भाताच्या रोप लावणीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतशिवारं सध्या माणसांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. शिराळा तालुक्याचा पश्चिम भागातील खुंदलापुर, मणदूर, सोनवडे, आरळा, मिरूखेवाडी परिसरामध्ये पारंपारीक भात पेरणीबरोबरच भाताची रोपलावणही मोठ्या प्रमाणात केली जाते. उंच-सखल, डोंगर-पठारावर असणार्या शेतामध्ये शेतकरी वर्ग भात रोपे लावण्यात मग्न असल्याचे दिसुन येत आहे.

