दिपाली कांबळे हिची मंत्रालयात लिपिक पदी निवड

तासगाव, रविवार दि.24 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कुमठे येथील दिपाली कांबळे हिची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या स्पर्धा परीक्षेतून कर सहाय्यक व मंत्रालयीन लिपिक या पदी निवड झाली आहे. त्याचे वडील दिनकर कांबळे हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बेंद्री येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा करत आहेत. दिपालीस तिचे आई, वडील, भाऊ अमोल व कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी,इस्लामपूर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.