दिपाली कुंभार यांची मोहरे गावच्या पोलीस पाटील पदी निवड

शिराळा, दि.16 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) मोहरे (ता.शिराळा) या गावच्या पोलिस पाटील पदी दिपाली गणेश कुंभार यांची निवड झाली असुन नुकतेच त्यांना उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत नियुक्तीचे पत्र देण्यात आले असुन मोहरे गावच्या पहील्या महिला पोलीस पाटील होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. दरम्यान दिपाली कुंभार यांची मोहरे गावच्या पोलीस पाटील पदी निवड झालेबद्दल यशवंत ग्लुकोज सहकारी कारखान्याचे संचालक मा.एम.एस.कुंभार ,मोहरे गावचे माजी पोलिस पाटील श्री भगवान पाटील व जखिनवाडी गावचे माजी सरपंच- नरेंद्र पाटील,आरळा येथील सांगली बॅंकेचे कर्मचारी- गणेश कुंभार यांचे हस्ते दिपाली कुंभार यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामस्थांनीही शुभेच्छा दिल्या.