तासगाव, दि.25 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी आव्हानात्मक आहे नवीन शैक्षणिक धोरणात संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे असे उद्गार विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. महाविद्यालयात तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.अशाप्रकारे या आंतरराष्ट्रीय परिषदेत नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणार्या संभाव्य बदलांचा तज्ञांकडून उहापोह करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयावर व्याख्याने संपन्न झाली. तसेच विविध विषयावर संशोधन प्रकल्प सादर केले.आधुनिक संशोधनामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी उत्कृष्ट शोधनिबंध वाचन आणि पोस्टर प्रेझेंटेशन करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहभागी संशोधकांनी आपली मनोगते व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी दोन दिवस संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील सर्वांचे आभार मानले आणि महाविद्यालयाच्या कार्याचा धावता आढावा घेतला. प्रास्ताविक प्रा.डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. तर आभार उपप्राचार्य जे.ए.यादव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.अलका इनामदार, प्रा.सविता कोळेकर, डॉ.मेघा पाटील, प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. यावेळी डॉ.शंकर खाडे, डॉ.अजय अंभोरे, डॉ.जीवन घोडके, प्रा.प्रभाकर पाटील, डॉ.सुरेश खाबडे , डॉ.आर. एम.गणेशवाडे, डॉ. स्वाती जाधव, डॉ.पी.बी.तेली, डॉ.सचिन शिंदे, डॉ.आर.ए.काळेल, प्रा.बी.एस.हराळे, प्रा.व्ही.टी. कुंभार, डॉ.अमोल सोनवले, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
