नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

तासगाव, दि.1 मार्च 2023 (प्रतिनिधी महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त तासगाव शहरात महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तीन तास चाललेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये तब्बल 27 ट्रॉली कचरा संकलित झाला. तहसील कार्यालय व एस टी आगार च्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. तहसील कार्यालयाचा परिसरातील पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या, काटेरी झाडे झुडपे, वाळलेले गवत यापासून मुक्त करण्यासाठी कसलीही सूचना न करता शेकडो अनुयायी सकाळी ७:३०वाजले पासूनच कामाला लागले होते. प्रतिष्ठानच्या या अभियानामध्ये 200 हुन तासगाव बैठकीतील सदस्य सहभागी झाले. यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील, पालिकेचे कर्मचारी, वनविभाग अधिकारी, तसेच सार्वजनिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.