निमणी येथे सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यशाळा संपन्न


तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील निमणी येथील पंचक्रोशी विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये तासगाव येथील सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थींनींचा आंतरवासिता उपक्रम अंतर्गत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली. शशिकांत कोठावळे यांनी लेखन करताना लेखणी धरण्याची पद्धत, लेखनात बसण्याची पद्धत, लेखन करताना होणाऱ्या चुका, लेखनाचे नियम व त्यांचा वापर अशा विविध मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे नियोजन मुख्याधपिका उर्मिला पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम.पाटील, गटप्रमुख डॉ. बी.एम.उभाळे, नेहा कोळेकर व पल्लवी माळी यांनी केले. स्वागत मयुरी भोसले यांनी तर प्रास्ताविक अजिता गायकवाड यांनी केले. मनस्वी मोरे यांनी सूत्रसंचालन तर आभार मोहिनी पाटील यांनी मानले.

.